top of page

Recently added titles at the S. K. M. Library

शत्रूच्या सैनिकांना ठार मारण्यासाठी माणसं किंवा बंदुकाच लागतात, असं थोडंच आहे! अदृश्य जीवजंतू किंवा निर्जीव रसायनंसुध्दा त्यासाठी पुरेशी ठरतात, असं विज्ञान सांगतं. आता तर हे तंत्रज्ञान ही फक्त काही देशांचीच मक्तेदारी राहिलेली नसून दहशतवादी संघटनांच्याही आवाक्यात ते तंत्रज्ञान आलंय. आपल्यासारख्या निरपराध नागरिकांसमोर कोणतं मरण केव्हा आणि कसं उभं ठाकेल, काहीही सांगता येत नाही, येणार नाही. त्या महाभयानक संघर्षाची खडानखडा बित्तंबातमी आपल्यासमोर मांडणारं खळबळजनक पुस्तक

आज सारं जग त्यांना धर्मांध माथेफिरू म्हणून ओळखतं. अनेकदा त्यांचा धिक्कार केला जातो, तर कित्येकदा त्यांना चिरडण्यासाठी मोठमोठया लष्करी मोहिमा आखल्या जातात. त्यांच्या हातातलं इस्लामचं निशाण पाहून किंवा त्यांच्या तोंडची जिहादची भाषा ऐकून त्यांच्या धर्माबद्दलचे भलेबुरे समज-गैरसमज पसरवले जातात. भस्मासुरासारखं अक्राळविक्राळ रूप धारण करणाऱ्या अशा दहशतवाद्यांच्या मूळ प्रेरणा कोणत्या आणि स्वार्थासाठी त्यांना कठपुतळयांप्रमाणे नाचवणाऱ्या साम्राज्यवादी सूत्रधारांचे मनसुबे कोणते, याचा नावनिशीवार केलेला हा पंचनामा म्हणजे वाचकांचे लक्ष खिळवून ठेवणारी एक रहस्यकथाच! धर्म-अधर्माचा तात्त्वि काथ्याकूट न करता प्रत्यक्ष व्यवहारातील संघर्ष चितारणारी ही शोधकथा अनेकदा चीड आणते आणि तशीच अस्वस्थही करून सोडते. पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2008-09 |

सर्वांच्या तोंडचं पाणी पळवणा-या पेट्रोलियम नावाच्या ज्वालाग्राही पदार्थाची रंगतदार कथा आहे ही... वैज्ञानिक-आर्थिक-राजकीय-लष्करी अशा विविध अंगांनी रंगत गेलेलं ऐतिहासिक नाटय असंख्य प्रसंगांच्या मालिकेतून उलगडून दाखवणारं पुस्तक आहे हे... जगभर चौकस नजरेनं फिरून आलेल्या एका चाणाक्ष पत्रकारानं लिहिलेलं सध्याच्या अत्यंत 'हॉट टॉपिक'वरचं, नेमकी माहिती देणारं उत्कंठावर्धक पुस्तक आहे हे...

हा आजारी पडला, तर अमेरिकेची अर्थव्यवस्था काळवंडून जायची आणि हा प्रसन्न झाला, तर अनेक देशांत दिवाळी साजरी व्हायची. कित्येक राष्ट्रप्रमुख, उद्योगपती याच्या कृपाप्रसादासाठी तासनतास तिष्ठत बसायला तयार असायचे. हा शेख अहमद झाकी यामानी. सौदी राजघराण्याशी संबंधित. उच्चविद्याविभूषित तरुण. 'ओपेक', 'ओआपेक'सारख्या संघटनांचा पस्तीस वर्षांहूनही अधिक काळ सूत्रधार राहिलेला तज्ज्ञ. कार्लोससारख्या कुप्रसिध्द दहशतवाद्यालाही शह देऊ शकणारा सौदी तेलमंत्री. तेलाच्या अर्थकारणाचा व जागतिक राजकारणाचा रागरंगच पालटवून टाकणारा एक अवलिया. एक अफलातून तेलिया. त्याची ही कथा... डोळे दिपवणारी आणि तरीही अस्वस्थ करणारी

तात्कालिकतेच्या पलीकडे... राष्ट्रांच्या वा व्यक्तिसमूहांच्या आयुष्यातील दैनंदिन घटना-घडामोडींचा अन्वयार्थ लावतानाच तात्कालिकतेकडून सार्वकालिकत्वाकडे जाणे, हे अग्रलेखांचे कार्य. लोकसत्ताचे अग्रलेख वाचकप्रिय ठरतात ते यामुळेच. सखोल विचार, परखड विवेचन आणि सौष्ठवपूर्ण भाषा यांबरोबरच ठोस भूमिका हे या अग्रलेखांचे वैशिष्ट्य. अशाच काही निवडक अग्रलेखांचे हे संकलन. समकालीन इतिहासाचे साधन म्हणून ते उपयुक्त ठरेलच; परंतु वाचकांना वैचारिक आनंदाचा पुनःप्रत्ययही देईल !

bottom of page