top of page

अभंगाच्या अथांग सागराचा एक अवलिया म्हणजे संत तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांनी अनेक अभंग लिहून संतांच्या यादी मध्ये आपले नाव मोठे केले. त्यांनी पाच हजार अभंग रचून “तुकारामाची गाथा” ही काव्यरचना लिहिली. तुकाराम महाराजांनी संसार सुखाचा करण्यापेक्षा जनसामन्यांचे कल्याण कश्याने होईल, या उद्देशाने अभंगाची रचना केली. एक विचारवंत, कवी, समाजसुधारणा असे त्यांचे कार्य होते. मराठी साहित्यात तुकारामांची उंची इंग्रजीतील शेक्सपियर किंवा जर्मनमधील गोएथे यांच्याशी तुलनात्मक केली आहे. तुकाराम महाराजांनी संसार सुखाचा करण्यापेक्षा जनसामन्यांचे कल्याण कश्याने होईल, या उद्देशाने अभंगाची रचना केली.तुकाराम महाराज, मराठी भाषेतील महत्त्वाचा कवी. बाह्य जगाचे आध्यात्मिक अनुरूप रुपांतर करण्याची क्षमता त्यांच्या कडे होती. त्यांच्याकडे असलेली अलौकिक प्रतिभा व भाषा यामुळे वैशिष्ट्यपूर्ण साहित्यिक संस्कृतीचे दर्शन घडते. तेव्हापासून मराठी साहित्यिक संस्कृतीवर इतका खोलवर आणि व्यापकपणे प्रभाव पाडणारा दुसरा कोणी मराठी लेखक/कवी झाला नाही. आधिक माहितीकरिता पुढील link वर click करा  On-Line Literature on Sant Tukaram Maharaj

bottom of page